अहमदनगर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे

 


अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र अहमदनगर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात अहमदनगर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेली जीवितहानी दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे होवोत.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.


महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे.

— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.