कामगार संघटना म्हणजे काय ? What is a trade union?
कामगारांनी आपल्या नोकरीविषयक हितसंबंधांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी स्थापिलेली स्थायी स्वरूपाची संघटना. अशा संघटना जगातील जवळजवळ सर्व देशांत कामगारांनी स्थापिलेल्या आहेत. कामगार जेव्हा मोठ्या संख्येने एकत्र येऊन एक कारखानदारासाठी काम करू लागतात, त्यावेळी संघटनेची आवश्यकता निर्माण होते.
कामगार संघटना कायदा १९२६ हा कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देऊन त्यांना विशिष्ट दर्जा मिळवून देण्यासाठी व अशा संघटनांच्या सभासदांना संरक्षण देण्यासाठी इ.स. १९२६ साली भारतात तयार करण्यात आला.