प्रधानमंत्री पिक विमा योजना – तुम्हाला मिळाले का नाही चेक करा.

नैसर्गिक संकटांमुळे शेतीला बसलेल्या फटक्यातून शेतकरी सावरावा, त्याला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. मात्र, या योजनेतील सदोष तरतुदींमुळे २०१८-१९ या दुष्काळी वर्षांत अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक नुकसान भरपाई देण्याचा उद्देश केवळ नावापुरताच आहे का, असा प्रश्न दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे..‘पंतप्रधान पीक विमा योजने’तील सदोष तरतुदी आणि अंमलबजावणीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईपासून वंचित ठेवून विमा कंपन्या हजारो कोटी रुपये नफा मिळवीत आहेत. हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यामागे सुमारे एक कोटी रुपये विमा कंपन्या मिळवीत आहेत. उदा. २०१७-१८ साली परभणी जिल्ह्य़ात १०७ शेतकरी आत्महत्या घडल्या. याच परभणी जिल्ह्य़ातून रिलायन्स कंपनीस मिळालेला नफा १०१ कोटी रुपये आहे.

लाखो स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होत आहे, त्याचे कारण जाणून घ्या

२०१८-१९ या वर्षांत दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील शेतकरी आत्महत्या १,२३७ पेक्षा जास्त, तर मराठवाडय़ातून विमा कंपन्यांनी मिळविलेला नफा १,२३७ कोटी रुपये आहे. याचबरोबर संसदेच्या पटलावर ठेवण्यात आलेला पीक विमा योजनेसंबंधी भारताचे नियंत्रक-महालेखापरीक्षक अर्थात कॅगचा समग्र अहवाल (मार्च, २०१७) खासगी कॉर्पोरेट विमा कंपन्यांच्या दबावामुळे कोणतीही चर्चा न करता सोयीस्कररीत्या दुर्लक्षिण्यात आला.

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply