जिओचे सिम कार्ड बंद कसे करावे - ITech Marathi

बऱ्याच वेळा अशी वेळ येते की आपला मोबाईल हरवतो किंवा चोरीला जातो तर अशावेळी आपल्याला आपले सिम कार्ड ब्लॉक करणे गरजेचे असते .

किंवा इतरही काही कारण असतं की ज्यावेळी आपल्याला आपलं सिमकार्ड बंद करावे लागते आणि नवीन सिमकार्ड घ्यावे लागते त्यासाठी मित्रांना पण आज जिओ सिम कार्ड बंद कसे करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

सिम कार्ड आपल्याला बंद करण्यासाठी आपण सिम कार्ड खरेदी करण्याच्या वेळेस जे कागदपत्र किंवा आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे मतदान कार्ड असेल जे दिलेले असेल ते तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे कारण कंपनीला फोन लावल्यानंतर ते तुमच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी तुमचे कोणतेही ओळखीचे कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर विचारला जातो तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून त्याला धरले जाते.
जर तुम्ही कुठे कंपनीला फोन केला आणि सिम कार्ड बंद करण्यास विचारणा केल्यास तुम्हाला अनेक वेळेस टाईम घेतला जातो पण बंद करण्यास ब्लॉक करण्यास टाळाटाळ केली जाते.
Idea, Vodafone, Airtel, BSNL, jio इत्यादी कंपन्यांचे सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या कॉल सेंटरला संपर्क साधणे गरजेचे आहे.

जिओ सिम कार्ड बंद करण्यासाठी काय करावे ?

जिओचे सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला 198 किंवा 1800 889 9999 या नंबर वरती कॉल करायचा आहे.
कॉल लावला नंतर तुम्हाला कॉल सेंटर सी बोलण्याचा पर्याय निवडायचा आहे .
आता तुम्हाला त्यांना सिम कार्ड ब्लॉक करणे बाबत विचारणा करायचे आहे आणि सिम कार्ड ब्लॉक करण्यासंबंधीचे कारण सांगायचे आहे.
तुमचे आधार कार्ड मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड यांची ओळख तिची पुष्टी झाल्यानंतर तुमचे सिम कार्ड ब्लॉक केले जाईल.
अशाच प्रकारे आयडिया व्होडाफोन एअरटेल यांचे सिम कार्ड देखील तुम्ही ब्लॉक करू शकतात त्यांचा नंबर वर तुम्ही कॉल करून ब्लॉक करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने