७००० पुरुष सुरक्षा रक्षकांच्या कंत्राटी पद्धतीच्या प्रतीक्षाधीन यादीसाठी अर्ज- February 2020.
अ) पात्र अर्जदारांनी शारिरिक चाचणीकरिता येताना खाली नमूद कागदपत्राची १ प्रत (मुळ कागदपत्रासह) सोबत आणावी .
१) अलीकडील काळात काढलेली स्वतःची दोन छायाचित्रे.(अर्जामध्ये upload केलेले छायाचित्र व भरती करिता आणणारे छायाचित्र एकसारखे असावे.)
२) शाळा सोडल्याचा दाखला.
३) १०वी व १२वी पास झाल्याची प्रमाणपत्रे (Board Certificate).
४) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
५) आधार कार्ड.
६) जे उमेदवार बँक ट्रान्स्फर द्वारे भरती शुल्क भरणार आहेत त्या उमेदवारांनी बँक मध्ये शुल्क भरण्याची पावती सोबत आणावी (ज्यावर REFERENCE No /UTR No नमूद आहे )
७) एकाच UTR/Reference नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास सदर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.
८) उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी.
ब) मैदाणी चाचणी प्रक्रिया :-
१) ऑनलाईन आवेदन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणी करीता अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल. या संदशामध्ये मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची तारीख, वेळ व ठिकाण इत्यादी गोष्टीचा समावेश असेल. उमेदवारांनी मैदानी चाचणी करीता येताना ऑनलाईन अर्ज भरल्या बाबतची प्रिंट तसेच UTR/Reference नंबरची पावती घेऊन यावी. अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही.
२) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची भरती प्रक्रिया मुंबई व नागपूर या दोन ठिकाणी होणार आहे. अर्जामध्ये नमूद उमेदवाराने निवडलेल्या ठिकाणी उमेदवाराची भरती प्रक्रिया घेतली जाईल.
Post a Comment