कोरोनावर मात करण्यासाठी ‘रयत शिक्षण संस्थेकडून दोन कोटी रुपयांची मदत


सातारा |  कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी विविध स्वयंसेवी तसंच सेवाभावी संस्था, उद्योगपती, राजकारणी मंडळी तसंच खेळाडू पुढे येऊन मदतीचा हात देत आहेत. गरिबांच्या शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने कोरोनावर मात करण्यासाठी शासनाला मदतीचा हात दिला आहे.

रयत शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 2 कोटी रूपयांची मदत करण्याचं ठरवलं आहे. शिक्षण संस्थेमधले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाचं वेतन देण्याचं ठरवलं आहे.

अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने