कोरोनाचा सामना करण्यासाठीे, अनिल अग्रवालांची १०० कोटींची मदत

मुंबई : देशात कोरोनांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनार नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. काल जनता कर्फ्यूच्या माध्यमातून 5 वाजता संपूर्ण देश या कठीण परस्थितीत एकत्र असल्यांचं दृश्य संपूर्ण जगाने पाहिलं होतं. त्यातच आता कोरोनाचा सामना करण्यासाठी व्यापारी आणि उद्योजग पुढे येत आहेत. आनंद महिंद्राच्या घोषणेनंतर वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही मदतीची घोषणा केली आहे.
अनिल अग्रवाल यांनी कोरोना रोखण्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी कोरोना विषाणूचे औषध तयार करण्यासाठी 5 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

Post a Comment (0)

Previous Post Next Post