कारोना मुळे या रॉयल फॅमिली मधील राजकुमारी चा मृत्यू
नवी दिल्ली : कोरोनामुळे स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा मृत्यू झाला आहे. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांचा भाई प्रिंस सिक्सटो एनरिके डी बॉरबोनने फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिली. २६ मार्चला राजकुमारीचा मृत्यू झाला. कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होता. संपूर्ण जगात रॉयल कुटुंबातील हा पहिला मृत्यू आहे. देश-विदेशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. इटली, स्पेन आणि अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरु आहे.

राजकुमारीच्या भावाने फेसबुक पोस्टमध्ये सांगितला आहे की, कोरोना पॉजिटिव्ह असलेली ८६ वर्षांची प्रिंसेस यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मैड्रिडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. प्रिंसेसचा १९३३ मध्ये पॅरिसमध्ये झाला होता. त्यांना फ्रांसमध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी नंतर कमप्लूटेंस यूनिवर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं. आपल्या सामाजिक कार्यामुळे देखील त्यांची एक वेगळी ओळख होती.

स्पेनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. इटलीनंतर सर्वात जास्त मृत्यू येथे झाले आहेत. आतापर्यंत ३४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेन आणि इटलीमध्ये चीनपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post