पूर्व उच्‍च प्राथमिक व पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा निकाल जाहिर

पूर्व उच्‍च प्राथमिक व पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती
परीक्षेची संकेतस्‍थळावर अंतरिम उत्‍तरसूची प्रसिध्‍द

            अहमदनगर दि. 6 - महाराष्‍ट्र  राज्‍य परीक्षा परिषदेमार्फत दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्‍यात आलेल्‍या  पूर्व उच्‍च प्राथमिक (इ. 5 वी)  व पूर्व माध्‍यमिक  शिष्‍यवृत्‍ती  परीक्षा (‘ इ. 8 वी ) या परीक्षेची   इयत्‍तानिहाय  व  पेपरनिहाय अंतरिम (तात्‍पुरती) उत्‍तरसूची परिषदेच्‍या www.mscepune.in  व  https://puppss.mscescholarshipexam.in   या संकेतस्‍थळावर  या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्‍या माहितीसाठी प्रसिध्‍द करण्‍यात आली  आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

            अंतरिम उत्‍तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्‍यासाठीर  कार्यपध्‍दती -  अंतरिम उत्‍तरसूचीवर काही आक्षेप असल्‍यास त्‍याबाबतचे निवेदन परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर ऑनलाईन स्‍वरुपात करण्‍यात यावी.  ऑनलाईन निवेदनासाठी  पालकांकरिता संकेतस्‍थळावर व शाळाकरिता त्‍यांच्‍या लॉगिनमध्‍ये उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहे.  त्रूटी व आक्षेपासाठी  दिनांक 13 मार्च 2020 पर्यत मुदत देण्‍यात आली आहे. नंतर आलेल्‍या आक्षेप स्‍वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्‍याही प्रकारे आक्षेप स्‍वीकारले जाणार नाहीत. मुदतीत प्राप्‍त झालेल्‍या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्‍या उत्‍तर पाठविले जाणार नाही व मुदतीत प्राप्‍त झालेल्‍या ऑनलाईन निवेदनांवर संबधित विषय तज्‍ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्‍तरसूची परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल.

            

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने