Corona Effect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा 31 मार्चनंतर

मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 नुसार राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आल्या आहेत.


राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 राज्यात 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली लागू करण्यात आलेली आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने