Net banking नेट बँकिंग (ई-बँकिंग) म्हणजे काय ?

Net banking नेट बँकिंग (ई-बँकिंग) म्हणजे काय ?

जेव्हा प्रत्यक्ष बँकेत न जाता इंटरनेटच्या माध्यमातून बँकिंग सेवांचा वापर केला जातो तेव्हा त्याला नेट बँकिंग असे म्हणतात.नेट बँकिंग सुविधा मध्ये व्यक्तीला बँकेत जाऊन बँकिंग व्यवहार करण्याची आवश्यकता नसते घरबसल्या इंटरनेटच्या साह्याने स्वतःच्या बँकेशी संपर्क साधून व्यक्तीला बँकिंग सेवांचा लाभ घेता येतो.नेट बँकिंग सुविधा द्वारा खातेदार आपल्या बँक खात्यातील व्यवहारांचा स्वतः लक्ष ठेवू शकतो. एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पैशाचे हस्तांतरण करू शकतो.नेट बँकिंग सुविधा खातेदाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आणि लाभदायक आहे.

वैयक्तिक कॉम्प्युटर बँकिंग, इंटरनेट बँकिंग, फॉर्च्युनर बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, फोन बँकिंग, या सर्व सुविधांचा समावेश ई-बँकिंग मध्ये होतो. परंतु लक्षात घेतले पाहिजे की ज्या बँक व्यवहारात इलेक्ट्रॉनिक व संगणक व्यवस्थेचा वापर होतो त्या सर्वांचा समावेश ई-बँकिंग मध्ये केला जातो. एटीएम, वायर ट्रान्सफर, टेलिफोन बँकिंग,इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण व डेबिट कार्यांचा समावेश ई-बँकिंग मध्ये होत असतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post