भारतरत्न पुरस्कार: भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान

भारतरत्न पुरस्कार: भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान.


  1. हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा भारताच्या राष्ट्रपतींकडून साहित्य कला विज्ञान व सार्वजनिक सेवा आदी क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्यांना सामान्यतः 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिन प्रदान केला जातो हा सन्मान देण्यास देशात सन 1954 पासून सुरुवात झाली.
  2. सन 2016 17 तसेच 2018 च्या प्रजासत्ताक दिनी कोणासही भारतरत्न सन्मान घोषित केला गेला नव्हता.
  3. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख (मरणोत्तर)व प्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका( मरणोत्तर) या तिघांना सन 2019 चा भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला गेला.
प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला. सन 1969 ते 2012 पर्यंत ते राजकारणात सक्रिय होते. इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलं होतं.पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात ते परराष्ट्रमंत्री तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ते संरक्षण मत्री होते.25 जुलै 2012 रोजी त्यांना राष्ट्रपती पदग्रहण केले ते भारताचे तेरावे राष्ट्रपती होत.

नानाजी देशमुख
चंडिका दास अमृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख सामाजिक कार्यकर्ते.हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केलं. काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात सक्रिय भूमिका निभावली. राजकारण आणि सत्ताकारण यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी शाश्वत विकास साधणारे समाजकार्य करण्यास स्वतःला झोकून दिले. सन 1997 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर स ही पदवी प्रदान केली.

भूपेन हजारिका
भूपेन हजारिका प्रसिद्ध संगीतकार गीतकार आणि गायक तथा कवी चित्रपट निर्माते लेखक तसेच आसामच्या संस्कृतीचे गाड्या अभ्यासक होते.त्यांचा जन्म आसाम मधील तींसुकिया जिल्ह्यातील सध्या या गावात झाला सन 1946 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पदवी मिळवली त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडी प्राप्त केली सन 1992 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले गेले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने