तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे, वाचा

कोरणा विषाणूच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळे जिल्हे हे कोरणा रुग्णांच्या संख्येनुसार ऑरेंज ग्रीन आणि रेड या अशा तीन प्रकारे विभागले गेले होते.
यांची माहिती पुढे दिलेली आहे
राज्यात रेड झोनमध्ये 14 जिल्हे आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, यवतमाळ यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.  ऑरेंज झोनमध्ये  16 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदूरबार हे जिल्हे आहेत. तर कमी कोरोना रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. राज्यात 6 असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा, गडचिरोली हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने