सध्या सोशल मीडियावर 140 या अंकाने सुरू होणाऱ्या नंबर वरून फोन आल्यास बँक अकाउंट रिकामे होत असल्याचे मेसेज फिरत आहेत. परंतु ही माहिती खोटी असल्याच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी माहिती दिली आहे.

'१४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे  काढले जाऊन अकाउंट शून्य होते' या समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही.

मात्र कोणताही फोन आल्यास आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. यासंबंधी काळजी घेणे गरजेचे आहे. असं देखील महाराष्ट्र पोलिसांनी म्हटले आहे.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.