पाकिस्तान चा चीन ला , गोलीगत धोखा ! चीनच्या या ऍप वर पाकिस्तानात बंदी 🤷पाकिस्तानने आपला मित्र चीनला मोठा झटका दिला आहे. याला गोलीगत म्हणायला हरकत नाही, भारतानंतर आता पाकिस्तानने देखील चीनच्या बिगो अ‍ॅपवर बंदी घातली आहे. यामुळे टिक टोक ला देखील समज बसणार आहे. पाकिस्तानमध्ये अश्लील आणि अनैतिक साम्रगी दाखवत असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. या आधी पाकिस्तानने गेमिंग अ‍ॅप PUBGवर बंदी घातली होती.माझा पेपर, या पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार

मागील आठवड्यात लाहौरच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत टीक-टॉकवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनुसार, हे अ‍ॅप आधुनिक काळात वाईट आहे. टीक-टॉक पोर्नोग्राफीचा मोठा स्त्रोत आहे. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, टीक-टॉक आणि बिगोबाबत समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या होत्या.

पाकिस्तानी सरकारने म्हटले की, दोन्ही अ‍ॅपकडून आलेले उत्तर समाधानकारक नाही. यानंतर सरकारने बीगोवर बंदी घालत, टीक-टॉकला शेवटचा इशारा दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने