तुमच्या जागेत किंवा बिल्डिंग वर जिओ टावर बसवायचा आहे, तर ही माहिती तुमच्यासाठी, जाणून घ्या काय करायचे ?


tower लावण्याच्या निमित्ताने अनेक जण लुटला जातो. त्यामुळे आपण आज Jio टॉवर आपल्या जागेत बसवण्यासाठी काय करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
जर तुम्हाला तुमच्या जागेत जीओचा टॉवर बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुमच्या जागेची कंपनीकडून पाहणी केली जाईल तसेच आपल्या परिसराची आसपासच्या परिसराची पाहणी देखील कंपनीकडून केली जाईल.हे सर्व तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर कंपनीच्या माहितीनुसार होईल.


जिओ मध्ये छोट्या आणि मोठ्या अशा दोन प्रकारचे टॉवर असतात. तुमचे लहान टॉवर असतात त्यांचं rent कमी असते, तर जो मोठा टावर असतो त्याची rent जास्त असते. 
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्ही लहान टॉवर बसवायला तर महिन्याला 3500 रुपये, दर तीन वर्षांनी दहा टक्क्यांनी वाढले जाते. आणि पंधरा वर्षापर्यंत एग्रीमेंट असू शकते.
तुमच्या टॉवर लहान-मोठा , तुमचे लोकेशन, तसेच तुमच्या आसपासची माहितीनुसार कंपनीच्या निर्णयानुसार तुम्हाला रेंट मिळेल.
याच्या नंतर तुमच्या जागेचा एग्रीमेंट होईल 15 वर्षांसाठी, त्याच्यानंतर तुमच्या जमिनीवर किंवा तुमच्या बिल्डिंग वरती टॉवर लावला जाईल.
त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी आणि मॅनेजमेंट कंपनी करत असते.
त्याच्यासाठी कंपनी आणि तुमच्या मध्ये संबंध असतील बाहेर कोणी देखील नसणार आहे त्यामुळे एक रुपया देखील तुम्हाला खर्च येणार नाही.

ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ?
  • त्यासाठी तुम्हाला जिओ डॉट कॉम या वेबसाईटवर किंवा तुमच्या मोबाईल मधील जर जिओ माय जिओ ॲप असेल तर त्या ॲप मध्ये जा.
  • तिथे सगळ्यात शेवटी तुम्हाला जायचं आहे, आता तिथे Partner With Jio ह्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता जर तुमच्याकडे बिल्डिंग असेल तर बिल्डिंग वर क्लिक करा, जर तुमच्याकडे प्लॉट असेल तर प्लॉट वरती क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमचे लोकेशन आणि पिनकोड टाईप करायचा आहे , तिथे सबमिट करा.
  • किंवा तुम्ही तुमच्या डायरेक्ट गुगल मॅप वरती तुमचे लोकेशन सिलेक्ट करू शकतात.
  • आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि generate OTP वरती क्लिक करायचा आहे.
  • मोबाईल वर आलेला ओटीपी तिथे टाइप करा आणि सबमिट करा.
  • आता पुढे तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, यामध्ये तुमचे व्हाट्सअप नंबर देखील द्या.
  • तुमचा पत्ता आणि काही थोडीफार माहिती विचारलेला आहे ती सर्व टाईप करा आणि फॉर्म सबमिट करा.
आता तुमचा फॉर्म सक्सेसफुली submit होईल तशी माहिती तिथे दिसेल.जर तुम्ही फॉर्म भरला तर शंभर टक्के तुम्हाला टॉवर येईल याची गॅरंटी जियो देत नाही आणि आम्ही देत नाहीत
तुमचे लोकेशन तसेच एरिया पाहून तुम्हाला कंपनी संपर्क साधेल त्याच्यानंतर तुमची पुढची प्रोसेस होईल.जर कंपनीला फायदा होत असेल कंपनीला ती जागा चांगली वाटत असेल तर कंपनी तुमच्या स्वतः कॉन्टॅक्ट करेल आणि तुमच्याशी संपर्क साधतील.


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post