श्रावण महिन्यातील पहिला सण - नागपंचमी, जाणून घ्या नागपंचमीचे महत्व आणि आख्यायिका


नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते.जीके नाग उपलब्ध नसेल तिथे नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते.
आधुनिक काळात नागाच्या प्रतिकृतीची पूजा केली जाते आणि नागदेवतेला प्रसन्न केले जाते.
नागपंचमीची एक कथा देखील आहे,
जेव्हा कालिया नागाचा पराभव करून श्रीकृष्ण यमुना नदीतून वर आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नाग पूजा प्रचारात आली असे मानले जाते.
या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
महिला आणि नागपंचमी
नागपंचमीच्या दिवशी महिला व मुली झाडाला झोके बांधून झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावतात.
पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येवून फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या.
ग्रामीण भागात अजूनही ही प्रथा चालू आहे.


आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने