जनता कर्फ्यू दरम्यान, कर्जतची ही बँक सुरू राहणार !


 कर्जत येथील भारतीय स्टेट बँक कर्जत शाखा सुरू राहाणार आहे अशी माहिती बँकेचे शाखाधिकारी डोणगावकर साहेब यांनी दिली आहे.
 श्रीसंत गोदड महाराज यांच्या रथयात्रा निमित्त प्रशासनाने तीन दिवस जनता कर्फ्यू लावला असल्याने व कर्जत शहरात कोरोना रूग्ण आढळून आल्याने जनतेने बँकेत गर्दी करू नये असे आवाहनही शाखाधिकारी डोणगावकर यांनी केले आहे. 
जनतेने आवश्यक असल्यास बँकेत यावे अन्यथा आॅनलाईन व्यवहार करावेत. कर्जत ची शाखा ही सुरळीत सुरू आहे असेही डोणगावकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने