Guru Purnima: जाणून घ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व

गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते.

परंतु आता या दिवशी आपल्या गुरुजनांची भेट घेतली जाते.आपल्या गुरुजनांना आशीर्वाद घेतला जातो त्यांना भेटवस्तू दिल्या जातात.परंतु प्राचीन काळापासून आलेल्या रूढी आणि परंपरा विषय आपण माहिती पाहणार आहोत.
गुरुपौर्णिमा याच पौर्णिमेला जगाला प्रज्ञा,करुणा आणि मैत्री चे शिक्षण देणारे जगतवंदे,जगतगुरु भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते.आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात हा एक बौद्ध सण आहे.हि पौर्णिमा साधारणता
सम्बोधी प्राप्ती नंतर बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेशक सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संभोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षु म्हणून ओळखले जाते। आषाढ़ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षुणां पहिला धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया,थायलंड,श्रीलंका,लाओस,म्यानमार आणि वेगवेगळ्या थेरवादी देशामंध्ये साजरी केली जाते  

गुरुपौर्णिमा याच पौर्णिमेला जगाला प्रज्ञा,करुणा आणि मैत्री चे शिक्षण देणारे जगतवंदे,जगतगुरु भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते.आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात हा एक बौद्ध सण आहे.हि पौर्णिमा साधारणता

जुलै महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमे नंतर येते, या दिवशी भिक्खू संघाचा वर्षावासास सुरवात होते, वर्षावास काळात श्रध्दावान उपासक विहारात जावून भिख्खूंना श्रध्दाभावनेने भोजनदान करतात आणि धम्म श्रवण करतात.

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.
महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास! पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली.
सर्व मराठी टेक अपडेट मिळण्यासाठी आजच आमच्या फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने