हरतालिका व्रत कथा : व्रत करताना ही कथा नक्की वाचा आणि आपल्या व्रत सफल करा

 

आज भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच हरतालिका. 

सुवासिनी अखंड सौभाग्याचे व्रत आजच्या दिवशी करतात.

हरतालिकेच्या व्रतामध्ये 'हर' म्हणजेच भगवान शंकराची आराधना करण्यात येते. 

आपणा सर्वांना हरतालिकेच्या शुभेच्छा.


हरतालिकेची पारंपारिक कहानी पुढील प्रमाणे

कहाणी हरितालिके ची

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते! श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या प्राण्यांना आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांत विष्णू श्रेष्ठ नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो.तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर जाऊन केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे आहे ते व्रत. भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं.ते पूर्वी तू कसं केलं ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस होऊन तिने दुःख सहन केली हे तुझे सलाम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतकी त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला ही गोष्ट कबूल केल. ी नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही.रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं राग येण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेव आणि पासून मला दुसरा पती करणार नाही असा माझा निश्चय आहे असा असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबुल केला आहे त्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस.त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितला तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसर्‍या दिवशी मी वर्त कथा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस.इतक्यात तुझा बाप ती त्याला त्याने तुला तिकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकिकत सांगितली पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात विधी याचा असा आहे.

हरतालिका व्रत विधि पुढीलप्रमाणे

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून तें स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं आणि त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही अमंगल केलं तर फक्त जन्म वांदे होतात पुत्रशोक होतो.कहानी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे दारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण संपूर्ण.


अशा प्रकारेही हरतालिका व्रताची कहाणी होती तसेच व्रत कसे करावे याची देखील माहिती दिली आहे. पारंपारिक तसेच जुन्या पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीनुसार वरील माहिती दिलेली आहे .


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने