CBI म्हणजे काय ? सीबीआय नेमकं कसं काम करते ? सीबीआय मधील नोकरीच्या संधी !
Central bureau of investigation (CBI) हे भारत सरकारचे विशेष गुन्हे अन्वेषण विभाग आणि गुप्तहेर खाते आहे. सीबीआयची स्थापना ही 1 एप्रिल 1963 रोजीी झाली. सीबीआय बद्दल बरीीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीी वाचा.
- सर्व केंद्र सरकारच्या सार्वजनिक सेवेतील भ्रष्टाचार आणि फसवणूकीची प्रकरणे. विभाग, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि केंद्रीय वित्तीय संस्था.
- बँकेची फसवणूक, आर्थिक फसवणूक, आयात निर्यात व विदेशी विनिमय उल्लंघन, अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी, पुरातन वस्तू, सांस्कृतिक मालमत्ता आणि इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी इत्यादी आर्थिक गुन्हे.
- दहशतवाद, बॉम्बस्फोट, खळबळ उडवून देणारा खून, खंडणीसाठी अपहरण आणि माफिया / अंडरवर्ल्ड यांनी केलेले गुन्हे यासारख्या विशेष गुन्हे.