सोलापूर मध्ये कोरोणा देवीची स्थापना , देवीला दिला जात आहे कोंबड्या आणि बोकडांचा बळी -bbc marathi


कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सोलापुरात उघडकीस आला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात पारधी वस्तीमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर संबंधित प्रशासनानेही तत्काळ याची दखल घेत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अंध श्रद्धा निर्मुलन समितीनं देखील लोकांना भावनेच्या आहारी न जाण्याचं आवाहन केलं आहे.

"बार्शीमध्ये काही व्यक्तींकडून 'कोरोना' नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. एवढंच नाही तर स्थापन केलेल्या कोरोना देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी कोंबडा, बोकडाचा बळी देवून तिचं पूजन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना प्राप्त झाली," असं बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. डी. गिरीगोसावी यांनी सांगितलं.

यासंबंधी अधिक वृत्त हे बीबीसी मराठी'ने प्रसिद्ध केला आहे ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने