Oppo Reno 4Pro | 8 GB रॅम , पाच कॅमेरे आणि जबरदस्त फास्ट चार्जिंग

 


Oppo Reno 4Pro full information in Marathi | 8 GB रॅम , पाच कॅमेरे आणि जबरदस्त फास्ट चार्जिंग |ITechमराठी.com

कंपनीने Reno 4  सीरीज मधील Reno 4 Pro केला गेला आहे. या इवेंट मध्ये ओप्पो वॉच पण लॉन्च केला गेला आहे.

फोन मध्ये सिंगल पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन च्या डावीकडे कट आऊट देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 3D बॉर्डर लेस स्क्रीन मिळते. फोन मध्ये एक सिम स्लॉट, एक यूएसबी C टाईप पोर्ट आणि स्पीकर देण्यात आला आहे. फोनच्या मागे स्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे.

Oppo Reno 4Pro मध्ये पाच कॅमेरे देण्यात आले आहेत.डिवाइसच्या मागील कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सल (f/1.7) Sony IMX586 चा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8-मेगापिक्सलचा (f/2.2) अल्ट्रावाइड सेंसर, 2-मेगापिक्सलचा मोनो सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी यात 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप आह

रेनो 4 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.4-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मधील डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 20:9 आसपेक्ट रेश्यो आणि 402ppi सह येतो. इंडियन मॉडेल मध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट दिला आहे, ज्या सोबत 8 जीबी रॅम मिळेल. फोन मध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

बॅटरी बॅकअप साठी फोन मध्ये 4,000mAh च्या बॅटरीचा समावेश आहे जी 65W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. या टेक्नॉलॉजीमुळे फक्त 36 मिनिटांत डिवाइस पूर्णपणे चार्ज केला जाऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने या स्मार्टफोन मध्ये वाई-फाई, 5जी नेटवर्क, 4G VoLTE, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच स्मार्टफोन Android 10 वर आधारित ColorOS 7.2 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल. फोन Starry Night आणि Silky White कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.


Oppo Reno 4 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,990 रुपये आहे. सध्या डिवाइस एकच रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. या फोनची विक्री 5 ऑगस्टला अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट समवेत अनेक मोठ्या ऑनलाइन रिटेल स्टोर्स वर केली जाईल. डिवाइस सोबत अनेक ऑफर्स पण देण्यात आल्या आहेत.

Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post