Coronavirus : गुगल भारताला करणार १३५ कोटींची मदत

मूळ फोटो रॉयटर्स

अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. असं असतानाच माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलने भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केलीय.

भारतामधील करोनासंदर्भातील चिंताजनक परिस्थिती पाहून धक्का बसला आहे. गुगल आणि गुगलमधील सर्वजण भारताला १३५ कोटींची मदत करणार आहेत. युनिसेफच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, सर्वाधिक धोका असणाऱ्या समाजातील घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोनासंदर्भातील माहिती पोहचवण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे,” असं पिचाई यांनी स्पष्ट केलं आहे. (लोकसत्ता )

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने