Mothers Day Messages in Marathi: मदर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश

 

Mothers Day Messages in Marathi: मदर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश


घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात “आई” नावाचं पान कधीच मिटत नाही, सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात.! “स्वामी तीन्ही जगांचा..आई विना भिकारी.. “आ” म्हणजे “आत्मा”. “ई” म्हणजे “ईश्वर” (परमात्मा).. आत्मा व परमात्मा यांचे एकरुप.. ती ‘आई’


मुंबईत घाई शिर्डीत साई फूलात जाई गल्लीगल्लीत भाई पण जगात भारी केवळ आपली आई मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Mother’s Day Mom!


मिटलेलं फुल आणि पोटात जपलेलं मुल उमलत जातांना पहाण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं.. कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो एक असा आरसा आहे, ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत..! देशातील सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी औषधावर दिलेली लिमलेटची गोळी आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात मेतकूट कालवलेला मऊ तूपभात आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने