Spotify : जगातील सर्वात जास्त डाउनलोड केलेले Audio Streaming App

 

Spotify
Audio Streaming App

Spotify हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय ऑडिओ स्ट्रीमिंग अॅप्सपैकी एक आहे आणि त्याने Android डिव्हाइसवर एक अब्ज डाउनलोड ओलांडले आहेत. अँड्रॉइड अहवालात असे दिसून आले आहे की वापरकर्त्यांनी हे अॅप अब्जाहूनही जास्त वेळा गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले आहे. गुगलने आपली Google संगीत सेवा बंद केल्यामुळे या स्पॉटिफाय प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक स्थापित इन्स्टॉल केलेले संगीत अॅप बनले आहे. त्यामुळे हे अँप जगातील सर्वात जास्त  वेळा डाउनलोड केलेले Audio Streaming App ठरले आहे .

अमेरिका आणि भारतात सर्वात जास्त वापरकर्ते 

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पोटिफायने अमेरिका आणि भारत सारख्या बाजारात विक्रमी वाढ नोंदविली आहे. अहवालानुसार, गेल्या एका वर्षात, स्पॉटिफाय प्रीमियम सेवा ग्राहक 21 टक्क्यांनी वाढले आहेत आणि 15.8 कोटींच्या आकड्यावर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात स्पोटिफायने आपली पॉडकास्ट सेवा सुरू केली आणि वापरकर्ते अँकर अ‍ॅपच्या मदतीने पॉडकास्ट तयार करू शकतात. पुढील दोन वर्षांसाठी ही सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने