व्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय । Astrology Tips for Success in Business in Marathi

रोज कितीतरी लोक व्यवसायाची स्वप्ने बघत व्यवसाय सुरु करतात, यातील हातावरील मोजण्या इतके माणसे व्यवसाय पुढे नेतात तर बऱ्यापैकी बरेच लोक दुकान गुंढाळून कर्जत बुडून बसतात. याला बरीच कारणे असतात अपुरे भांडवल, भागीदारासोबत मनमिटाव, कौशल्याची कमतरता, चुकीचे ठिकाण आणि बरच काही. परंतु मी जर तुम्हाला सांगितलं सर्व काही नीट असतांना सुद्धा रोज काहींना काही निमित्ताने व्यवसायात नुकसान येत असेल आणि पर्यायाने व्यवसाय बंद करायची वेळ येत असेल तर तुम्ही नक्की एकदा ज्योतिष शास्त्रातील खालील गोष्टींचा विचार करून बदल करून बघायला हवा.

व्यवसायात यश मिळवण्यासाठी मेहनतीची आवश्यकता असतेच तसेच आपल्या ग्रहांना मजबुत करायची पण आवश्यकता असते. व्यवसायात यश मिळवण्यासाठी ग्रहांना बळकट कसे करायचे हे आज बघुयात. व्यवसायाचा ग्रहांशी काय संबंध आहे हे देखील बघुयात.

व्यवसायात यश मिळवण्यासाठी ग्रहांचा काय संबंध आहे ?

१) प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाच्या मागे कुठल्यातरी एका ग्रहाची मुख्य भूमिका असते.
२) त्या व्यवसायाचा ग्रह बळकट असेल तर व्यवसाय चांगला चालतो नसेल तर काही ना काही अडचणी येतातच.
३) ग्रहाच्या दशेनुसार व्यवसायात उतार चढाव येतो.

संबंधित व्यवसायाचा ग्रह बळकट करून त्याची नित्य नियमाने आराधना करून व्यवसायात यश मिळवु शकतो.

१) कपड्यांचा व्यवसाय : 

 • शिवणकाम, कपडे विकायचा व्यवसाय असल्यास त्याचा प्रमुख ग्रह हा शुक्र  ग्रह आहे.
 • ह्या ग्रहाचा व्यवसाय असणाऱ्याने सकाळ संध्याकाळ शुक्र च्या मंत्राचा जाप करावा.
 • स्फटिक ची माळ गळ्यात धारण करावी.
 • दर शुक्रवारी लक्ष्मी देवीला पांढऱ्या मिठाईचा प्रसाद द्यावा.
 • काळा रंग वर्जित करा.

२) खाण्या-पिण्याचा व्यवसाय :

 • खाण्यापिण्याचा व्यवसाय असेल जसे कि लहान गृहउद्योग, हॉटेल्स, कारखाने तर गुरु ग्रह प्रमुख ग्रह आहे.
 • शिजवलेल्या अन्नात गुरु ग्रहाचा वास असतो.
 • जलीय खाद्यपदार्थामध्ये चंद्र ग्रहाचा वास असतो.
 • जिथे खाण्या-पिण्या संबंधातील व्यवसाय असतो तिथे श्री कृष्णाचा सदा जाप किंवा उपासना करावी.
 • कपाळावर चंदनाचा टिळा लावावा.
 • खिशात पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र असु द्यावे.
 • दुकानात श्रीकृष्णाचा फोटो लावावा आणि रोज पूजा करावी.

३)  ब्युटी पार्लर किंवा कॉस्मेटिकस चे दुकान (स्त्रियांचे) :

 • या संबंधातील व्यवसाय चे शुक्र ग्रह मुख्य असतो.
 • कुठे कुठे चंद्र ग्रह भूमिका बजावतो.
 • शुक्र आणि चंद्र ग्रह प्रबळ करण्यासाठी गुलाब चे अत्तर वापरात आणावे.
 • दुकानात लक्ष्मी देवीची आराधना करावी.
 • प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सुगंधित फुल अर्पण करावे.

४) शिक्षा किंवा शैक्षणिक संबंधातील व्यवसाय :

 • हे व्यवसायचे  बुध, गुरु आणि शुक्र प्रमुख ग्रह आहेत.
 • मुख्य करून हे व्यवसाय चालण्यासाठी गुरु ग्रह प्रबळ असावा.
 • हे व्यवसाय यशस्वी रित्या चालण्यासाठी महादेवाची उपासना करावी.
 • रोज शंकराच्या पिंडीला पांढरे फुल, बेलपत्र वाहिले पाहिजे.
 • कार्यस्थळाचा रंग पिवळसर किंवा पांढरा  द्यावा.

५) रिअल इस्टेट किंवा जमिनी विषयक व्यवसाय :

 • या व्यवसायाचे मुख्य ग्रह आहे मंगल ग्रह.
 • मंगल ग्रह कमजोर असेल तर व्यवसाय बुडू शकतो किंवा कर्जबाजारी होऊ शकता.
 • मंगल ग्रह मजबूत करण्यासाठी गणपती ची रोज नित्यनियमाने आराधना करावी.
 • रोज हनुमान चालिसा पठण करावी.

 

Leave A Reply