शेतकरी प्रमाणपत्र कसे काढायचे ? How to get farmer certificate

शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (How to get farmer certificate?)

शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (How to get farmer certificate?) तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात बनवू शकता आणि आपण घरबसल्या मोबाईल च्या माध्यमातून देखील बनवू शकता यासाठी आपल्याला आपले सरकार या वेबसाईट वर तुमचे खाते बनवावे लागेल .या अगोदर आपण शेतकरी प्रमाणपत्र (farmer certificate) बद्दल माहिती पाहुयात .

कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास फायदा होतो. जमीन खरेदी करत असताना देखील अनेकदा शेतकरी प्रमाणपत्र सादर करावं लागते.

farmer

शेतकरी प्रमाणपत्र (farmer certificate) काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे !

 • अर्जदाराचा फोटो
 • ओळखीचा पुरावा – यापैकी एक – मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड
 • पत्त्याचा पुरावा – यापैकी एक – मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / आधार कार्ड / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति.
 • स्व घोषणापत्र
 • संबंधित जागेचा 7/12 आणि ८ अ चा उतारा

 • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्रासाठी अर्ज

या कुटूंबाना नाही मिळणार PM किसान योजनेचा लाभ ,मिळणार नाही ६,००० रुपये

शेतकरी प्रमाणपत्र (farmer certificate) काढण्यासाठी खर्च किती येतो ?

रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/- जर आपंन आपले सरकार पोर्टल वर अर्ज स्वतः केला तर आपल्याला हे 33.60/रु मध्ये मिळते . तुम्ही csc किंवा आपले सरकार सेवा केंद्रात देखील हा काढू शकता .तिथे कदाचित जाडा पैसे आकारले जाऊ शकतात .

आपले सरकारवरुन शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा ? ( How to apply for farmer certificate from your government?)

 • आपले सरकारवरच्या वेबसाईटवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या.
 • लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील तुम्ही महसूल विभाग निवडा.
 •  तिथून पुढे शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय निवडा.
 • पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या,
 • वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.
 • सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत.
 • यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा.
 • जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट कसा करावा

१५ दिवसात या वेबसाईट वर आपल्याला आपले शेतकरी प्रमाणपत्र आपल्याला मिळून जाईल .ते प्रिंट करून घ्या

आपले सरकार सेवा पोर्टल – https://aaplesarkar.mahaonline.gov.in

Leave A Reply