आषाढ स्पेशल कापण्या | कापण्या रेसिपी मराठी | kapnya recipe

 

आषाढ स्पेशल कापण्या 

महाराष्ट्रामध्ये आषाढ महिन्यात विविध तळणी बनवली जाते, यामध्ये कापण्या हा एक पारंपरिक पदार्थ आहे. बनवायला खुप सोपा व घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा पदार्थ.

 

रेसिपी बनवण्यासाठी लागणारा कालावधी- ३० मिनिटे

 

साहित्य

गहू पीठ -२ वाटी

बेसन पीठ – २ चमचे

गुळ- १ वाटी ( चवीनुसार)

पाणी

मीठ- लहान चिमुटभर

वेलची व जायफळ पूड – लहान अर्धा चमचा

तेल – तळण्यासाठी

कापण्या कशा बनवतात

कृती

गुळाचे पाणी

१.गॅसवर भांड्यात एक वाटी घ्या व त्या मध्ये एक वाटी गुळ घाला व विरघळून घ्या.

२.लक्षात ठेवा गुळाचा पाक करायचा नाही. व यावर हे पाणी पूर्ण थंड करा.

३.जास्त गोड कापण्या हव्या असल्यास, पाणी कमी वापरा व दाटसर पाणी करा.

 

कापण्या

१. एक पसरट ताटामध्ये गव्हाचे २ वाटी पीठ, बेसन पीठ २ चमचे, मीठ लहान चिमट व वेलची व जायफळ पूड लहान अर्धा चमचा घ्या व छान मिक्स करून घ्या.

२. आता एक चमचा तेल गरम करून त्याचे मोहन घाला. व मिक्स करून घ्या.

३.आता गुळाच्या पाण्याच्या सहाय्याने पीठ मळून घ्या, पीठ मळताना घट्ट मिळा.

४.आता १० मिनिटे पीठ तसेच झाकून ठेवा.

५. आता आपण जसे शंकर पाळी करतो त्याच पद्धतीने कापण्या करा व तळून घ्या. तळताना गॅस मध्यम कमी ठेवा.

६.मस्त खमंग व खुसखुशीत कापण्या तयार. १५ दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता.

 

 

 

Leave A Reply