साबुदाणा खिचडी रेसिपी | उपवासाची साबुदाणा खिचडी | आषाढ एकादशी स्पेशल रेसिपी

विविध उपवासासाठी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी, मऊ व मोकळी खिचडी बनवण्याची पध्दत.

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi)

साबुदाण्याची खिचडी हा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आषाढी-कार्तिकी एकादशांच्या दिवशी घरोघरी बनतो. ही खिचडी उपवासाच्या दिवशी हमखास खाल्ली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या देवळांमध्ये साबुदाण्याच्या खिचडीचाच प्रसाद असतो.साबुदाणा पांढऱ्या रंगाचे गोल छोटे कडक दाने असते.

साबुदाणा खिचडी साठी लागणारे साहित्य (Ingredients for Sabudana Khichdi)

 • साबुदाणा – १ वाटी
 • शेंगदाणे पावडर – ४ चमचे
 • बटाटा – १ मध्यम
 •  हिरवी मिरची / मिरची पूड – चवीनुसार
 • मीठ – चवीनुसार
 • तेल -४ चमचे
 • पाणी – साबुदाणा भिजवण्या साठी

साबुदाणा खिचडी कृती (Sago Khichdi recipe)

 1. साबुदाणा भिजवण्या साठी एका भांड्यात साबुदाणा बुडेल एवढे पाणी घ्या व १० मिनट तसच ठेवा व नंतर पाणी काढा व रात्रभर किंवा कमीतकमी ६ तास तसच ठेवा.
 2.  वरील पध्दतीने साबुदाणा भिजवला तर तो नीट भिजतो .
 3. साबुदाणा मध्ये मीठ व शेंगदाणे पावडर घालून मिक्स करून घ्या. ( मिरची पावडर वापरणार असाल तर यात मिक्स करा)
 4. कढई गॅसवर ठेवावी, त्यात ४ चमचे तेल घाला. तेल गरम झाले की बारीक चिरलेला बटाटा घाला व २-३ मिनिटे छान परतून घ्या. यामुळे बटाटा छान शिजला जाईल.
 5. आता यामध्ये मिरची टाका व १ मिनिट भर छान भाजा. व यात साबुदाणा घाला ४-५ मिनिटे छान भाजू द्या.
 6.  मऊ खिचडी हवी असल्यास पाण्याचा शिंतोडा मारा व १ मिनट झाकून ठेवा.
 7. मस्त मऊ व मोकळी साबुदाणा खिचडी तयार.
Sago Khichdi recipe

टीप

१. शेंगदाणे अाख्खे सुध्दा वापरू शकता व शेंगदाणा पावडर ही भाजलेल्या शेंगदाण्याची करावी.

२.तुम्ही उपवासाला कोथिंबीर किंवा जीरे खात असला तर त्याचाही वापर करा.

 

 

1 Comment
 1. […] साबुदाणा खिचडी रेसिपी […]

Leave A Reply