Kojagiri Purnima 2021 Date।जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व।कोजागिरी पौर्णिमा 2021

Kojagiri Purnima 2021 Date।जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि  धार्मिक महत्व।कोजागिरी पौर्णिमा 2021

Kojagiri Purnima 2021 Date।जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि  धार्मिक महत्व

कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी

कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी असेही संबोधिले जाते.व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात .दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात. 


 ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो.चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात.श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.


कोजागिरी पौर्णिमेचे महत्व


Kojagiri Purnima 2021 Date।जाणून घ्या शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमेच्या पुजेचा शुभ मुहूर्त:  शरद पौर्णिमा येत्या 19 ऑक्टोंबर, 20 ऑक्टोंबलला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तर बुधवारी रात्री 8.20 वाजता समाप्त होईल.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने