ग्रंथालयाचे प्रकार- What are the types library in Marathiग्रंथालयाचे प्रकार- What are the types library in Marathi


 ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ग्रंथालय ही प्राचीन सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि तो मानवसंस्कृतीशी समांतर आहे. ग्रंथवाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक होत. या घटकांचे स्वरूप व त्याविषयाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते. याबरोबरच ग्रंथालयाची वास्तू, ग्रंथालयीन प्रशासन, आंतरग्रंथालयीन सहकार्य व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयीन संघटना इ. घटकही आधुनिक ग्रंथालयविचारात येतात.

ग्रंथालयाचे प्रकार- What are the types library in Marathi

शैक्षणिक ग्रंथालयाची माहिती शैक्षणिक ग्रंथालयाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. विविध कौशल्ये प्राप्त करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासात या ग्रंथालयाचे महत्त्वाचे आहे. 

 शैक्षणिक ग्रंथालयाची उदिष्टे :  शैक्षणिक व सामाजिक घटकांच्या माहिती विषयक गरजांची पूर्तता करणे. विविधं प्रकारच्या शैक्षणिकव संदर्भ ग्रंथाचे उपार्जन करून संवर्धन करणे. विविध अभ्यासक्रमांस लागणारे वाचन साहित्य उपलब्ध करून देणे. वाचकांना द्यावयाच्या माहितीचे व संदर्भ सेवांचे नियोजन करणे. 
१.शालेय ग्रंथालय : पाचवी ते दहावी या वर्गांसाठी शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना जी ग्रंथालये उपलब्ध आहेत, त्यांना शालेय ग्रंथालय असे म्हणतात. आपल्या देशात अलीकडील काळात माध्यमिक स्तरांवर शालेय ग्रंथालये दिसत असली तरी ती शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहेत. शालेय ग्रंथालये ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविण्याची कामे करतात. यामध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकांची देवघेव करणे,विशिष्ट माहिती संदर्भ पुरवणे, ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे.ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे.चर्चासत्र आयोजित करणे. नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीवा निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने