पंढरपूरशी संपर्क वाढविण्यासाठी बांधण्यात येणारे अनेक रस्ते प्रकल्पही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार

 


पंढरपूर : श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गां (Palkhi Marag) च्या (NH-965G), तीन विभागांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)येत्या 8 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत‌.हे प्रकल्प पंढरपूरला भाविकांची ये-जा करणे सुलभ व्हावे यासाठी सुरू करण्यात येत आहेत.या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला पालखी’ साठी समर्पित पदपथ बांधले जातीलज्यामुळे भाविकांना  विनाअडथळा आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध होईल.

दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किमीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पाटस ते तोंडाळे-बोंडाळे असा सुमारे 130 किमीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्गया मार्गांचे चौपदरीकरण करून त्यांच्या दोन्ही बाजूंना पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले  जातीलज्याचा प्रस्तावित खर्च अनुक्रमे  सुमारे  6690 कोटी रुपये आणि सुमारे  4400 कोटी रुपये इतका आहे.

या समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने