कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ करणाऱ्या वाळू तस्कर पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन


 कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना काल शिवीगाळ करून अडथळा निर्माण करणारा पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याचे निलंबन झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

आपली कुवत पाहून वक्तव्य करावे : शहर अध्यक्ष मनिषा सोनमाळी


         शुक्रवार, दि १९ रोजी कर्जतचे प्रांताधिकारी यांनी आपल्या पथकासह अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर पकडला असता त्या वाहनालगत उभा असणारा पोलीस उपअधीक्षक कार्यलयात कार्यरत असणारा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने  शिवीगाळ करून थोरबोले यांना अडथळा आणून तो टीपर पळवून नेला होता. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात व्हरकटे आणि अज्ञात चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निलंबन करण्यात आले. एका सरकारी कर्मचाऱ्याने आपले वरिष्ठ अधिकारी असणारे यांनाच शिवीगाळ करून अडथळा निर्माण केल्याच्या घटनेने दोन्ही विभागात मोठी खळबळ उडाली होती. 


दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम


 महसुल कर्मचाऱ्याचा आक्रमक पवित्रा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा 

       प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा करणारा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यास तात्काळ बडतर्फ करावे. यासह गुन्हा दाखल करण्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदार स्वता उपस्थित असताना झालेला विलंब याचा महसुल अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच सदर फिर्यादीमध्ये ३५३ कलम लावण्याची मागणी कर्जत महसुल प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने