कर्जत नगरपंचायती वर यावेळी झेंडा कुणाचा ?कर्जत : कर्जत नगरपंचायतचे बिगुल वाजले असून,निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस महाआघाडी चालणार की भाजपा व स्थानिक आघाड्या एकत्रित येणार

याकडे तालुक्याचे लक्ष आता लागले आहे. नगरपंचायतीत भाजपाची सत्ता होती.

मागील निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने एकहाती सत्ता काबीज केली होती. काँग्रेस पक्षाला चार जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस पक्षाच्या पण उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून प्रतिभा भैलुमे विजयी झाल्या होत्या नंतर त्यांनी भाजपाला  पाच वर्षे साथ दिली. भाजपने १७ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादी ला मात्र आपले खाते उघडता आले नव्हते. 

Ahmednagar: बाळासाहेब साळुंके यांची जिल्हा बँकेच्या 'संचालकपदी' निवड

काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेना आघाडी होणार का? 

कर्जत  नरपंचायतच्या राजकीय आ़घाडी स्थानिक पातळीवर न होता,

वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी ठरवणार असे स्पष्ट चित्र आहे. यंदाची नगरपंचायत

निवडणूक अनेक बाबींनी महत्त्वपूर्ण असून, या निवडणुकीचे परिणाम आगामी

विधानसभेवर उमटणारे आहेत. त्यामुळे नगरपंचायतीत आपलीच सत्ता

आणण्यासाठी  राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित दादा पवार, भाजपचे नेते माजी मंत्री राम शिंदे

 प्रामुख्याने शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.

राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने

विरोधी गटाला चार जागांवर समाधान

मानावे लावले होते. या पाच वर्षांच्या

काळात पुलाखालून बरेच पाणी  गेले.

काँग्रेस ची सर्व मदार माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष प्रविण दादा घुले यांच्या वरच अवलंबून आहे. घुले यांनी नगरसेवकांची संख्या चार वर पोहोचवली होती. विरोधी पक्षनेते पद काँग्रेस पक्षाकडे होते. तर विरोधी पक्षनेते म्हणून पुजा मेहत्रे यांनी चांगले काम केले आहे. तर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सचिन घुले, मोनाली तोटे व डॉ संदीप बरबडे यांनी आपल्या वार्डात चांगले कामे केली आहेत. सचिन घुले यांनी तर काँग्रेस पक्षाची ताकद कायम दाखवून दिली आहे. 

राऊत घुले  हे   कर्जत शहरात  प्राबल्य असणारे दोन प्रमुख गट आहेत.राऊत हे भाजपचे शहरातील प्रथम क्रमांक चे नेते होते तर माजी मंत्री राम शिंदे यांच्या व नामदेव राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता काबीज केली होती. नामदेव राऊत यांना प्रथम नगराध्यक्ष केले होते तर दुसऱ्या वेळी उपनगराध्यक्ष करण्यात आले होते परंतु नुकतेच 

नामदेव राऊत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून आमदार रोहित दादा पवार यांच्या रूपाने दूरदृष्टी नेतृत्व असल्याने रोहित दादा पवार यांच्या सर्वांगिण विकास करण्याची हातोटी मुळे राऊत हे प्रभावित होऊन रोहित दादा पवार यांच्या        नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला असल्याने आमदार रोहित दादा पवार यांची

नगरपंचायतमधील  राऊत आणि राष्ट्रवादी चे जुने जाणते व नवीन कार्यकर्ते यांच्या वर अवलंबून असेल असे जनतेला वाटत आहे पंरतु आमदार रोहित दादा पवार व पवार घराण्याची राजकीय पार्श्वभूमी पाहता रोहित दादा पवार हे कोणावरही अवलंबून राहाणारे नाहीत. ते एकहाती सत्ता खेचून  आणणारे नेतृत्व असल्याने राष्ट्रवादी ची संपूर्ण मदार ही रोहित दादा पवार यांच्या वरच अवलंबून आहे. रोहित दादा पवार यांच्या स्वभावाचे आकलन रोज जवळ ़़असणारे कार्यकर्ते यांना ही होत नसल्याने शेवटपर्यंत कुणाला उमेदवारी मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस च्या इच्छुक उमेदवारांना ही आपल्या उमेदवारी मिळेल हे सांगता येत नाही. 

 शिवसेना व आरपीआयची मतेही काही प्रभागात

निर्णायक ठरणार आहेत. जिल्हा बँकेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व ना. बाळासाहेब थोरात यांनी महाआघाडीचा प्रयोग केला. त्या राजकीय पार्श्वभूमीवर कर्जत नगरपंचायतमध्ये ते

महाआघाडीचा प्रयोग करणार का,

याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने