देशात IVF technology ने The first habitual वासरू जन्माला !

देशात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने पहिले बानी वासरु जन्माला घालणाऱ्या आयव्हीएफ केंद्राला केंद्रीय मंत्री परशोत्तम रूपाला यांची भेटकेंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम  रूपाला यांनी आज पुण्यातील,  जे. के. ट्रस्ट बोवेजिक्स या आयव्ही एफ केंद्राला भेट दिली (J. K. Trust Bouvejix). याच केंद्रात आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने, देशातील पहिल्या बानी जातीच्या वासराला जन्म देण्यात आला होता.

सहिवाल जातीच्या गाईपासून, मादी भ्रूण बाहेर काढण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष बघण्याची संधी मला मिळली होती अशी आठवण रूपाला यांनी यावेळी बोलतांना सांगितली. पशुधनात सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञानासाठीच्या डॉ विजयपथ सिंघानिया उत्कृष्टता केंद्रात, ही वैज्ञानिक प्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने, वासरांची पैदास करणाऱ्या या शाश्वत मॉडेलवर आणि या व्यवसायातून उत्पन्न वाढवण्याच्या विपुल संधीवर त्यांनी भर दिला.


जे. के. बोवा जेनिक्स हा जे. के. ट्रस्ट चा उपक्रम आहे. या ट्रस्टनेच, जनुकीयदृष्ट्या उत्तम असलेल्या गाई आणि म्हशींच्या जनुकांचे गुणन करण्यासाठीच्या आय व्हीएफ आणि ई टी तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. यात, देशी जातींच्या पशूची पैदास करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने