क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी पुणे येथे १८४८ साली मुलींची शाळा काढली. त्याकरिता त्यांनी प्रथम आपली पत्नी सावित्री बाई फुले यांना शिकवून शिक्षिका बनवावे लागले. साहजिकच त्या काळातील सामाजिक परिस्थिति पाहता तत्कालीन ब्राम्हण आणि काही अंशी बहुजन दोघांनीही विरोध केलेला आपणांस वाचावयास मिळतो. मुळात इंग्रज, मुस्लिम आणि मातंग हेच महात्मा फुले यांसोबत होते असे दिसते.
महात्मा फुले यांनी मुलींसाठी एकून तीन शाळा काढल्या होत्या आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक खास शाळा काढली होती. याकामी सावित्री बाई फुले यांनीही कोणाच्याही विरोधाला न जुमानता प्रखर झुंझ देत मुलींना शिकवण्याचे काम जोमाने चालू ठेवले.
असे असले तरी भारतातील मुलींच्या शिक्षणाची सुरवात करण्याचे काम प्रथमतः ब्रिटीश आणि अमेरिकन मिशन -यांनी केले ही गोष्ट फारशा लोकांना माहीत नाही. इ.स. १८१० साली मिशनरयांनी बंगाल प्रांतात मुलींची पहिली शाळा काढली होती. १८२७ पर्यंत मुलींच्या अशा शाळांची संख्या १२ पर्यंत गेली. विशेष म्हणजे या शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थीनींची संख्या उल्लेखनीय होती.
Post a Comment