Karjat :जुन्या नोटरीधारकांवर अन्याय करू नका . अॅड दिपक भंडारी

 


ज्या नोटरी धारकांनी तीनदा प्रमाणपत्राचे नुतनीकरण केले. त्यांना पुन्हा प्रमाणपत्र नूतनीकरण करता येणार नाही. या संदर्भात केंद्र सरकारच्या नोटरी कायदा सुधारण्याच्या प्रस्तावित मसूद्याने एका व्यक्तीला ठराविक काळाकरिताच नोटरीचा अधिकार देण्यावर भर देण्यात आला आहे. हा निर्णय नोटरी धारक  वकीलावर अन्यायकारक आहे. त्यामुळे नवीन  वकिलांना संधी देण्यासाठी जुन्या नोटरीधारकांवर अन्याय करू नका, अशी मागणी नोटरी असोसिएशनचे कर्जत चे सदस्य अॅड  दिपक भंडारी यांनी केली आहे.

या नवीन नोटरी कायदा विरोधी कर्जत च्या नोटरी वकिलांनी दि.१४/१२/२०२१रोजी एक दिवस काम बंद ठेवून निषेध नोंदवला आहे. जेष्ठ विधीज्ञ कैलास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत 

 १ ) १५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या नोटरी धारकांना काढू नये , २ ) प्रत्येक नोटरी वकिलांना विधी व न्याय विभागामार्फत ओळखपत्र देण्यात यावे , ३ ) प्रत्येक नोटरी वकीलांना पथकरामध्ये ( टोल ) माफी मिळावी आशा मागण्या करण्यात आल्या अॅड . कैलासराव शेवाळे अॅड . दादासाहेब कोल्हे अॅड . राम दहिवळकर अॅड . सुरेश शिंदे अॅड . अरुण पुंडे अॅड . दिपक भंडारी  आदी उपस्थित होते.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने