National farmers Day: राष्ट्रीय शेतकरी दीन ,निमित्त खास लेख - महेश राऊत

 शेतकरी ही शेती धारण करणारी व्यक्ती असते. शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. National farmers Day निमित्ताने विशेष माहिती पाहणार आहोत .महाराष्ट्रातील शेतकरी इतिहास लिहिणे, अभ्यासणे आणि जतन करणे आवश्यक आहे. शेतकरीवर्ग प्राचीन काळापासून व्यवस्थेचा बळी आहे.


महाराष्ट्र राज्याची देखील सन १९६० मध्ये विदर्भ, मराठवाडा मिळून निर्मिती झाली. याच महाराष्ट्रातून देशाला वसंतराव नाईक याांच्या रुपाने पहिला शेतकरी मुख्यमंत्री मिळाला. वसंतराव नाईक हे हाडाचे प्रगतशील शेतकरी होते.

शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी  प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी" लागते. जर पाणी नसेल तर शेतीबरोरच इतर जोडधंदे ,व्यवसाय करावे लागतात . शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. जे शेतकरी कोरडवाहू करतात ते नोकरी करणे किंवा एखादा व्यवसाय करणे पसंद करतात .

जे शेतकरी आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत, दैनंदिन शेती कामाचे उत्तम व्यवस्थापन ठेवून पुऱ्या क्षमतेने आपली शेती कामे चालवतात त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी येतो, उत्पादन वाढते व शेतीत फायदा होतो. ज्या शेतकऱ्यांची कामे याप्रमाणे चालत नाहीत त्यांचा शेतीचा उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन कमी येते व शेती फायद्यात चालत नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतकऱ्यांनीच याचे महत्त्व समजून आपल्या शेतीच्या दैनंदिन कामात सुधारणा केली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना स्वतः पुढच्या अडचणीतून बाहेर पडता येईल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने