State Level Journalism Award: स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराची घोषणा

स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराची घोषणा, सुभाष माळवे नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी राज्य स्तरावरील मानाचा पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दै.मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सकारात्मक लेखन या विषयावरील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांची घोषणा करण्यात आली. राज्यस्तरीय पुरस्कारांसोबत प्रत्येक विभागातून तीन पुरस्कार व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण एका शानदार कार्यक्रमात होणार आहे. 

दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार देण्यात येत आहेत. दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि दै.मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागिल दोन वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. संयोजकांच्या वतीने सकारात्मक लेखन हा विषय पुरस्कारासाठी ठेवण्यात आला होता. प्रत्येक विभागातून मोठ्या प्रमाणात स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या होत्या. निवड समितीने पुरस्कारांसाठी आलेल्या साहित्यांचे परिक्षण करून पुरस्कार विजेत्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. पुरस्कारप्राप्त सर्वांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांनी अभिनंदन केले आहे.

असे आहेत पुरस्कार प्राप्त मान्यवर

प्रो.डॉ.दिनकर माने (विभाग प्रमुख, जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद), डॉ. बबन जोगदंड (प्रभारी अधिकारी, यशदा, पुणे), संतोष मानूरकर (संपादक दै.दिव्य लोकप्रभा, बीड) यांना राज्यस्तरीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. 

मुंबई विभाग 

मुंबई विभागासाठी प्रशांत गोडसे, (जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई), हर्षदा वेदपाठक (मुक्त पत्रकार, मुंबई), सुरेश ठमके (ई टीव्ही भारत, मुंबई) यांना विभागीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. 

मराठवाडा विभाग 

मराठवाडा विभागासाठी संजय मुचक (दै.पुढारी कन्नड तालुका प्रतिनिधी) मोहन धारासुरकर (दै.आधुनिक केसरी, विभागीय प्रतिनिधी, परभणी), दिपक शेळके (दै. युवा आदर्श, संपादक, जालना) यांना विभागीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत.

नागपूर विभाग

नागपूर विभागासाठी महेश पानसे (दै. नागपूर पोस्ट), आनंद शर्मा (दै.खबरो में हमारा शहर) यांना विभागीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत.

पूर्व विदर्भ विभाग

पूर्व विदर्भ विभागासाठी राजूभाऊ कुकडे (संपादक, भुमिपुत्राची हाक), मनिष रक्षमवार (खबर महाराष्ट्राची), राधेश्याम भेंडारकर (दै.लोकमत समाचार, गोंदिया), पंकज वानखेडे (दै.नवराष्ट्र, भंडारा), श्रीधर दुग्गीलारापाटी (दै.लोकमत, गडचिरोली) यांना विभागीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत.

पश्चिम विदर्भ विभाग

पश्चिम विदर्भ विभागासाठी संतोष धरमकार (संपादक, लेखणीचे वारे, अकोला), शैलेष डहाके (दै.पुण्यनगरी, यवतमाळ) यांना विभागीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत.

पश्चिम महाराष्ट्र विभाग

पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी बाजीराव खांदवे (दै.मराठवाडा साथी, आवृत्तीप्रमुख अहमदनगर), लक्ष्मण मडके पाटील (दै.पराक्रमी, तालुका प्रतिनिधी शेवगाव), राजेश सटाणकर (संपादक, सिटी टाईम्स, अहमदनगर), सुभाष माळवे (तालुका प्रतिनिधी, दै. नवराष्ट्र), विठ्‌ठल शिंदे (संपादक दै. राज आनंद, अहमदनगर), सुभाष चिंद्ये, (संपदाक, दै.नगर स्वतंत्र, अहमदनगर) यांना विभागीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत.

या सर्व मान्यवर पत्रकारांना व मागिल वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कार प्राप्त मान्यवर पत्रकारांना जानेवारी महिण्यात भव्य सोहळ्यात पुरस्कार वितरीत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी सांगितले.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने