Search

Thergaon Queen Arrested । रील्सवर देत होती शिव्या ,पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीचे video पहा .

Post by

 

Thergaon Queen Arrested

इन्स्टाग्रामर रील्समसाक्षीचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक रील्स व्हायरलही (reels viral) झाले होते. रील्समध्ये शिव्या घालत असल्याने युट्युबर काही नेटकर्‍यांनी तिला रोस्टही (youtuber roaster) केले होते. सोशल मीडियावर या तरुणीविरोधात कारवाई कशी होत नाही असा सवालही काही नेटकर्‍यांनी विचारला होता. धून शिव्या घालणे , अश्लील बोलणे एका तरुणीच्या चांगलेच अंगलट आले आहे.या प्रकरणी साक्षी महाले या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साक्षीचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.

थेरगाव क्वीन ला अटक होण्यापूर्वी pic.twitter.com/gDtfvSkfXq

— सुंदर चव्हाण (@Sundarspeak57) January 31, 2022

Marathi Nibandh: माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण – वैभवी दळवी

Post by

 Marathi Nibandh:माणसाच्या दैनंदिन जीवनात अनेक सुख-दु:खाचे क्षण येतात. माझ्या आयुष्यात पण असे बरेचसे आनंदाचे क्षण  येऊन गेले. आपण सुखाचे क्षण पण त्या नव्या एकादाच क्षण हा अविस्मरणीय असतो. आतापर्यंतचा माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा सण म्हणजे माझा १० वी चा निकाल. ९०% मिळवण्याचं मी टारगेट ठेवलं होतं. आणि मला १० वी च्या परीक्षेत 89.60% मिळाले.


मी १० वी मध्ये असताना मला खूप अडचणी आल्या पण त्या सगळ्या पार करत मी हे यश प्राप्त केलं. माझी शाळा व माझे घर हे १० किमी होते.  माझी शाळा ही सर्वसामान्यांसाठी होती. शाळेच्या बस, व्हॅन काही नव्हते. काही कारणांमुळे आम्हासा लांब रहायला जाव लागलं. माझी शाला बदलली पन  मी त्या नवीन शाळेत जात  च नव्हते म्हणून परत मी माझ्या जुन्या शाळेत प्रवेश घेतला. आणि मग रोज मूला माझी आई कधी कधी माझे वडील सुद्धा मला शाळेत सोडवायला व घ्यायला यायचे. शाळेजवळ च माझा क्लास होता. माझा क्लास दिवसातून एकदा  असायचा. म्हणून रोज सकाळी मी ५ वाजता  क्लास  ला जायचे.  ५.30 ला शाळा सुटली की एक तास लवकर क्लास मध्ये जाऊन बसायचो .



मी एकटीच बसायचे म्हणून माझी मैत्रीण सुद्धा घरी न जाता रोज माझ्या सोबत लवकर क्लास  मध्ये यायची . मग ६.३० ते 2.30 पुन्हा अभ्यास करून रात्री ९/९.३० या घरी जायचे. माझी आई मला घ्यायला यायची. आम्ही ज्या रस्त्याने  जायचा तो रात्री सामसुम असायचा. माझ्या आईने माझ्यासाठी खूप हाल किती हो सहन केले. पावसाळ्यात खूप च त्रास होयचा. बिचारी पाऊस असला तरी ही मला सोडायला घ्यायला यायची.. रात्री ९ला घरी गेल्यावर मग मी जेवण करायचे आणि अभ्यासाला बसायच लिखाण जास्त असले की १२ नंतर परत अभ्यास करायचे .

आवियोजन प्रगोग अभ्यास कधी होयचाच नाही. माझे शिक्षक पण मला खूप सहकार्य करायच मी रोज सकाळी तास आणि संध्याकाळी १/ दीड नास पाठांतर करायच शाळेत ऑफ तास असला तर मागे जाऊन मी लिखाण  काम करायचे. दर रविवारी आमचा पेपर असायचा. आणि मी घरी ३ तासाचा टाईम लावून पेपर  सोडवायचे.

मी एक निश्चय केला होता. मला काजू कतली खूप आवडते. आणि मी ठरवलं होतं की जोपर्यंत  मी माझं टारगेट पूर्ण करत नाही तोपर्यंत मी काजू कत्तली  नाही खाणार, दहावीचे पेपर तोड़ी परीक्षा मला चांगले गेले होते. आता निकालाची  वाट पाहत होते मी. निकालाच्या आदल्या दिवशी माझ्या आईने घरी काजू कत्तली  केली रात्रभर आम्ही जागेच होतो. मला तर खूप टेन्शन आले होते मी टारगेट पूर्ण करू शकेल ना ? मला कमी मार्कस पडले तर ?  मी निकाल चेक केला. आणि ८९.60% पाहून खूप आनंदी झाले. माझ आई वडील मामा मामी आनी आजोबा सगळेच खूप खुश झाले.

माझ्या आई वडील आजी च्या डोळ्यानले ते आनंदाश्रू पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं होतं. आईने कानूकतली ने माझ तोंड गोड केलं.

माझ्या मामी ने सुद्धा काजू कतली आणली होती. आजी ने १००० रु. मोठ्या काकांनी ५०० रू असे सर्वजण मला बक्षीस देऊन माझं कौतुक करीत होते.

आणि माझ्या शाळेत रामराज्य माध्यमिक विद्यालयात  सुधा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन माझा सन्मान करण्यात आला. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा ठा होता. मी माझा हा दिवस कधीच विसरू शकत नाही. हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही.

- वैभवी कपिल दळवी 

Marathi Nibandh:संत गाडगे महाराज , मराठी निबंध

Post by

 

संत गाडगे महाराज , मराठी निबंध

Marathi Nibandh: महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. त्या परंपरेतील एक थोर संत म्हणजे संत गाडगे महाराज त्यांचा जन्म १८७६ साली झाला. त्यांचे बालपणीचे नाव होते डेबू. त्यांचे वडील परिठाचा व्यवसाय करत ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मामाने त्यांचा सांभाळ केला. ते मामाच्या शेतात खूप कष्ट करत असत. व्यसने व अज्ञान यांमुळे समाजाची प्रचंड हानी होते, हे त्यांनी जवळून पाहिले. यामुळे त्यांनी व्यसनांचा धिक्कार केला आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचा निर्धार केला..

Marathi Nibandh:वाचनाची आवड मराठी निबंध

गाडगेबाबा स्वतःच्या संसारात गुंतले नाहीत. ते गावोगाव हिंडत व लोकजागृती करत. त्यांच्या हातात सदैव झाडू आणि गाडग्याचे फुटके खापर असे, म्हणूनच लोक त्यांना 'गाडगेबाबा' म्हणू लागले. ते जेथे जात, तेथे स्वतः झाडलोट करत व लोकांना कष्ट करण्यास प्रवृत्त करत. ते स्वत:साठी काही घेत नसत लोकांसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या, सदावर्ते चालवली. सदैव जनसेवेत ते रमले. ते लोकांना सांगत, “देव देवळात नाही, तो माणसांत आहे. आजही आपले शासन स्वच्छ गावांसाठी 'श्री संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान' या नावानेच स्वच्छतेची मोहीम राबवत आहे.

Marathi Nibandh:वाचनाची आवड मराठी निबंध

Post by



 Marathi Nibandh: वाचन हा एक चांगला छंद आहे. वाचनाने चांगली करमणूक होते. ज्याला वाचनाची आवड असते, त्याला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात पुस्तकाची चांगली सोबत होते. म्हातारपणीही वाचन हे खूप मदत करते. त्यामुळे म्हातारपणाचे दिवस कंटाळवाणे वाटत नाहीत.


वाचनाने ज्ञानप्राप्ती होते. वाचनाने खूप गोष्टींची माहिती होते. पूर्वीच्या काळात कोण कोण राजे होते, त्यांनी काय काय पराक्रम केले, हे इतिहासाची पुस्तके सांगतात. महापूर, दुष्काळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांत किंवा लढाया, आक्रमण अशा मानवांनी आणलेल्या संकटांत ती माणसे कशी वागली होती, ते आपल्याला ग्रंथवाचनातूनच कळते.


वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी माणसे आपली आत्मचरित्रे लिहून ठेवतात. काही माणसे इतर मोठ्या माणसांची चरित्रे लिहून ठेवतात. ही चरित्रे आपण वाचली, तर आपल्याला खूप शिकायला मिळते. काव्याची पुस्तके वाचल्यावर आपल्याला खूप आनंद मिळतो. सुंदर सुंदर कविता आपल्या ओळखीच्या होतात. पण या सगळ्यासाठी हवी वाचनाची आवड !

Mauni Amavasya 2022 : पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी हे काम करा !

Post by
Mauni Amavasya 2022
Mauni Amavasya 2022 


 Mauni Amavasya 2022:मंगळवार, १ फेब्रुवारी रोजी मौनी अमावस्या आहे. या दिवशी पितृपूजनाचे विशेष महत्त्व मानले जाते. मौनी अमावस्येला मौन धारण केल्याने पितृदोष दूर होण्यासाठी विशेष उपाय केले जातात.  पितृदोष असणाऱ्या व्यक्तींच्या शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात. कुटुंबात सुख-शांतीचा अभाव आहे. संतती वाढीमध्ये समस्या निर्माण होतात. पितृ दोष या दिवशी काही विशेष उपायांनी शांत होऊ शकतो. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल...

अशी  करा पितृपूजा 

  • पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पितरांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. 
  •  पितृदोष निवारणासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल फुले व थोडे काळे तीळ टाकावे. 
  •  यानंतर हे जल सूर्यदेवाला अर्पण करून आपल्या पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना करा. 
  • पिंपळाच्या झाडावर पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा आणि त्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा करा. 
  • मौनी अमावस्येच्या दिवशी तिळाचे लाडू, तिळाचे तेल, आवळा, ब्लँकेट, कपडे यासारख्या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा.

Mahatma Gandhi: गांधीजींच्या मतानुसार स्वराज्य म्हणजे काय ?

Post by

 


Mahatma Gandhi:तुम्ही आमच्यावर राज्य केले, आता देश सोडून जावा, असे ठणकावून सांगण्याची क्षमता सत्यामध्ये असून ते बापूजींनी निर्भीडपणे ब्रिटिशांना सांगितले. सत्याचा कधीच पराजय होत नाही, त्याचप्रमाणे अहिंसेचाही पराजय होत नाही. जगातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शस्त्राने दिले जाऊच शकत नाही. शस्त्राने दिलेल्या उत्तरांमध्ये कदाचित राज्य बदलेल, राजे बदलतील. पण, मूलभूत प्रश्न कधीच मिटणार नाही. ते मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी अहिंसकता हाच एकमेव मार्ग आहे. 

 

समाजव्यवस्था कशी असावी, माणसं कशी, त्यांचे व्यवहार कसे होते, त्यांच्यात कोणती मूल्ये रुजली, त्याचा अाविष्कार समाजजीवनावर होतो, यावर गांधीजी सतत विचार करीत होते. या प्रक्रियेला अनुकूल साधन म्हणजे सत्याग्रह, सविनय कायदेभंग, असहकाराद्वारे त्यांनी केलेले प्रबोधन आहे.


Start Up and Innovation:स्टार्ट अप ॲण्ड इनोव्हेशन, स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालयाच्या संघाची निवड

Post by


Start Up and Innovation: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी, त्यातून अभिनव कल्पनांचे व्यावसायिकतेत रुपांतर करावे यासाठी ' स्टार्ट अप ॲण्ड इनोव्हेशन ' कक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले. त्या अंतर्गत ' इनोव्हेशन टू इंटरप्राईज ' स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील पहिल्या फेरीत ३९८ संघ व ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या फेरीतून १०० टॉप आयडीयलची निवड तज्ज्ञांनी केली. त्यात दादा पाटील महाविद्यालयाच्या संघाची निवड झाली ,तर दुसऱ्या फेरीत क्लस्टर टीममधून अंतिम २५ संघ निवडले गेले. त्यातदेखील महाविद्यालयाचा संघ पात्र ठरला. या संघाने ' महिला सबलीकरण व आरोग्य संवर्धन ' या सूत्रानुसार मासिक पाळीच्यावेळी वापरण्यासाठी  महिलांना सुबक व सुलभ पद्धतीने वापरण्यासाठी स्वस्तात आणि आरोग्यदायी ' सॅनिटरी पॅड' बनविण्याचे  प्रात्यक्षिक (Demonstration of making sanitary pads) सादर केले.हा सॅनिटरी पॅड  विघटन न करता त्याचा पुनर्वापर करता येतो ही कल्पना मांडली. त्यामुळे अंतिम फेरीत या संघाची निवड झाली. प्रा.  संतोष क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली...

१. अंजुषा सुखदेव शेळके ( गटप्रमुख )

२.  शुभम दत्तात्रय कदम

३.  मंजूषा सुखदेव शेळके

४. नेहा विजय ननवरे

५.  ओंकार  भूषण ढेरे

या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत धडक मारून दादा पाटील महाविद्यालयाच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला. या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करीत असताना, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मान.

 राजेंद्रतात्या फाळके यांनी " कर्जत सारख्या ग्रामीण भागातील दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचे कौतुक केले, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेत कोठेही कमी नाहीत हेच यातून सिद्ध झाल्याचे" प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी या विद्यार्थ्यांना स्टार्ट अप व इनोव्हेशनसाठी महाविद्यालय सर्वतोपरी  मदत करणार असल्याचे जाहीर केले. या यशाबद्दल  र.शि.संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे  सदस्य   मान.आमदार रोहितदादा पवार आणि मान.अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मान. राजेंद्र निंबाळकर व मान.बाप्पासाहेब धांडे, मा. बाळासाहेब साळुंके आदींनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत असून, कर्जतच्या मातीतदेखील प्रतिभेचे अंकुर सुप्त स्वरुपात असल्याची व त्यास योग्य असे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भास्कर मोरे,डॉ. महेंद्र पाटील, आय.क्यू. ए. सी. चे समन्वयक डॉ.संदीप पै, श्रीमंत शेळके व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Dada Patil College :दादा पाटील महाविद्यालयाचे सेट परीक्षेतील सुयश

Post by


Dada Patil College :रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयातील प्रा. संतोष क्षीरसागर( रसायनशास्त्र), प्रा. सुजित म्हस्के (भौतिकशास्त्र), प्रा. सुप्रिया साळुंके( भौतिकशास्त्र), प्रा.श्रीमती शिल्पा तोडमल (इलेक्ट्रॉनिक्स )व प्रा. धनंजय कदम (भूगोल )हे सर्वजण एकाच वेळी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.युजीसी नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सहाय्यक प्राध्यापक पदावर नेमणूक होण्यासाठी सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत  या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत सर्व प्राध्यापक उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या यशा


बद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष  राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार     रोहितदादा पवार व अंबादास पिसाळ ,दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर व  बप्पासाहेब धांडे यांच्यासह सर्व स्टाफने त्यांचे अभिनंदन केले .या सत्कार प्रसंगी उपप्राचार्य डॉ. महेंद्र पाटील, प्रा.भास्कर मोरे, डॉ. संजय ठुबे,आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ.संदीप पै, प्रा. भागवत यादव , डॉ.प्रमोद परदेशी व डॉ.अशोक म्हस्के हे उपस्थित होते.

Mahatma Gandhi Punyatithi 2022: महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती ,नसणाऱ्या काही खास गोष्टी

Post by

Mahatma Gandhi Punyatithi
Mahatma Gandhi Punyatithi

Mahatma Gandhi Punyatithi 2022:
मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.  अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.

  • असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
  • गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला.
  • इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजी यांचा  कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला.
  • इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.
  • एप्रिल १९१८ला पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात, व्हाईसरॉय ने गांधीना दिल्लीत एका युद्ध परिषदेसाठी बोलावले. कदाचित गांधीनी त्यांचा इंग्रज साम्राज्यास असलेला पाठींबा दर्शवावा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदत मिळवावी हा त्यामागचा हेतू होता.
  • गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत.
  • इ.स. १९४६ मधील ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना गांधीजींनी काँग्रेसला दिली.
  • लहानपणी अनेकदा गांधीजींनी मांस भक्षण केले होते. ते मुख्यत्वेकरून त्यांच्या कुतुहलामुळे तसेच त्यांचा मित्र शेख मेहताब याच्या सांगण्यावरून होते. शाकाहाराची कल्पना हिंदू तसेच जैन प्रथांमध्ये खोलवर रुजली आहे.

how to take screenshot in laptop: लॅपटॉपमध्ये स्क्रीनशॉट कसा घ्यायचा ,जाणून घ्या

Post by

 


how to take screenshot in laptop: कधी-कधी तुम्हाला मिळालेला विलक्षण मजकूर कॅप्चर करावा लागतो, गेममधील तुमच्या अप्रतिम उच्च स्कोअरचा पुरावा घ्यावा लागतो किंवा तुमच्या डिव्हाइसवर काय चूक होत आहे याचे चित्र IT विभागाला पाठवावे लागते. स्क्रीनशॉट कसा घ्यावा हे जाणून घेतल्याने तुम्हाला बरेच काही समजावून सांगता येते. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्क्रीन कॅप्चर करण्याची  पद्धत असते. काही तुम्हाला विशिष्ट भाग कॅप्चर करण्यास किंवा स्क्रोलिंग स्क्रीनशॉट घेण्याची परवानगी देतात. ते कसे हे जाणून घेवूयात .

Android फोन किंवा टॅब्लेटवर स्क्रीनशॉट कसा घ्यावा ?

Android फोन किंवा टॅबलेटवर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी, पॉवर आणि व्हॉल्यूम डाउन बटणे एकाच वेळी दाबा.

जेव्हा ते कार्य करते, तेव्हा तुम्हाला कॅप्चर आवाज ऐकू येईल आणि स्क्रीनच्या तळाशी डावीकडे स्क्रीनशॉट पूर्वावलोकन दिसेल, जिथे तुम्ही संपादित किंवा शेअर करण्यासाठी त्यावर टॅप करू शकता.

काही मोबाइल मध्ये स्क्रोलिंग चे फीचर असते तुम्ही जर स्क्रीन वर स्क्रोल केल टीआर स्क्रीन कॅप्चर होते .

लॅपटॉपमध्ये स्क्रीनशॉट कसा घ्यायचा ?

विंडोज लॅपटॉप किंवा डेस्कटॉप संगणकावर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी, प्रिंट स्क्रीन कीबोर्ड की दाबा (सामान्यतः Prt Scn किंवा तत्सम संक्षिप्त). तुम्हाला फक्त सक्रिय विंडोचा स्क्रीनशॉट घ्यायचा असल्यास, Alt आणि Print Screen की एकत्र दाबा. तुमचा कॅप्चर केलेला स्क्रीनशॉट क्लिपबोर्डवर आपोआप कॉपी केला जातो आणि पेस्ट करण्यासाठी तुम्ही Microsoft Paint, Photoshop किंवा तुम्ही वापरत असलेले कोणतेही इमेज सॉफ्टवेअर उघडले पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते संपादित आणि सेव्ह करू शकता.

जर तुम्हाला Windows 10 मध्ये स्क्रीनचा काही भाग कॅप्चर करायचा असेल तर Windows, Shift आणि S की एकत्र दाबून पहा. त्यानंतर तुम्हाला हवे असलेले बिट हायलाइट करण्यासाठी तुम्ही क्लिक आणि ड्रॅग करू शकता आणि ते कॅप्चर करण्यासाठी जाऊ द्या. विंडोजच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये, तुम्ही स्निपिंग टूलसह तेच करू शकता, जे शोध बारमध्ये स्टार्ट क्लिक करून आणि "स्निपिंग टूल" टाइप करून आढळते. पुन्हा एकदा, तुम्हाला पेस्ट करण्यासाठी स्क्रीनशॉट तुमच्या क्लिपबोर्डवर कॉपी केला जाईल.

स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी आणि ते स्वयंचलितपणे सेव्ह करण्यासाठी, विंडोज आणि प्रिंट स्क्रीन की एकत्र दाबा. स्क्रिनशॉट्स तुमच्या पिक्चर्स फोल्डरमधील स्क्रीनशॉट्स नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह केले जातात.
Back to Top