माजी मंत्री प्रा. राम शिंदेंनी केला प्रेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

 


कर्जत तालुका प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा माजी मंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कर्जत येथील संपर्क कार्यालयात हा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, सुनिल यादव, गणेश क्षीरसागर, अनिल गदादे, गणेश पालवे उपस्थित होते.


यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप, उपाध्यक्ष अस्लम पठाण, सचिव मिलिंद राऊत, खजिनदार योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, प्रा. किशोर कांबळे, विनायक ढवळे यांचा सत्कार झाला. त्यानंतर प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. भाऊसाहेब तोरडमल यांनी आभार मानले.


रिलाएबल ॲग्रो व पत्रकार संघाकडून सत्कार


कर्जत येथील रिलाएबल ॲग्रो सर्व्हिसेस येथे संचालक भाऊसाहेब धोदाड, पप्पूशेठ धोदाड यांच्या वतीने प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत अडसूळ हे उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र अनारसे, उपाध्यक्ष निलेश दिवटे, सचिव अफरोज पठाण, सल्लागार मोतीराम शिंदे, सुभाष माळवे यांनी प्रा. किरण जगताप व भाऊसाहेब तोरडमल यांचा सत्कार केला. कुळधरण येथे ओंकार गुंड मित्र मंडळाच्या वतीने सत्कार घेण्यात आला.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने