Dada Patil College: दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ या सुसंस्काराचे आदर्श रूप आहेत, तर युवकांचे प्रेरणास्थान असणारे कुशाग्र बुद्धिमत्तेचे स्वामी विवेकानंद ही प्रेरणाशक्ती आहे .या महामानवांच्या विचार व कार्याचे अनुसरून करणारी सुसंस्कारित व कुशाग्र बुद्धिमत्तेची नवी पिढी हीच देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवणारी युवाशक्ती असेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी केले.

         येथील दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी प्रा.भास्कर मोरे,  आय .क्यू.ए. सी.चे समन्वयक डॉ.संदीप पै, डॉ.संतोष लगड कार्यालयीन अधीक्षक आर .आर. जाधव हे उपस्थित होते. 

        यावेळी प्रा. प्रवीण घालमे यांनी आपल्या मुख्य भाषणात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचार व कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रेरकशक्तीआहेत , तर स्वामी विवेकानंद यांनी सर्व समाज बांधवांना ' उठा! जागे व्हा! इतरांना जागे करा!' असा संदेश देणारे ,देशाच्या महासत्तेचे शाश्वत स्वप्न पाहणारे युवकांचे आदर्श आहेत असे सांगितले. या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. तर आभार डॉ. भारती काळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने