Karjat - Jamkhed : मधील या गावांना मिळणार 25 लाख रुपये,मतदारसंघातील गावांचा श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेत समावेश

 आ. रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; मतदारसंघातील गावांचा श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेत समावेश, प्रत्येक गावाला मिळणार 25 लाख रुपये

Karjat - Jamkhed


Karjat - Jamkhed:   राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने ‘ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी कर्जत तालुक्यामधील 6 गावांची पुणे वन्यजीव विभागांतर्गत निवड करण्यात आली असून त्यात बिटकेवाडी, चखालेवाडी, कोंभळी, खांडवी, थेरगाव चांदे खुर्द, म्हाळंगी या गावांचा समावेश आहे. 

बनावट औषध विक्री व खताची वाढीव रक्कम घेणाऱ्या कृषी दुकान चालकांवर गुन्हा दाखल karjat पोलिसांची कारवाई

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या योजनेत आपल्या मतदारसंघातील गावांचा समावेश व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार मतदारसंघातील 6 गावांचा यात समावेश करण्यात आला असून प्रत्येक गावासाठी 25 लाख रुपये प्रमाणे निधी या योजनेंतर्गत मंजूर झाला आहे म्हणजे एकूण दीड कोटी रुपये कर्जत तालुक्यातील 6 गावांसाठी उपलब्ध झाले असून आणखी 4 गावांना या योजनेत समाविष्ट करावे यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्नशील आहेत. त्यासंदर्भातील प्रस्तावही रेहेकुरी वन्यजीव कार्यालय व पुणे वन्यजीव विभाग यांच्यातर्फे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच नागरिकांनी आमदार रोहित पवार यांचे आभारही व्यक्त केले आहेत. 

कर्जत जामखेड तालुक्यातील जि. प शाळांना Amazon कडून आ. रोहित पवारांच्या हस्ते मोफत स्मार्ट टॅबचे वाटप

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीला पूरक असे जोडधंदे निर्माण करणे तसेच मानव व वन्य प्राण्यांतील संघर्ष कमी करणे, वन व वन्य जीवांचे संरक्षण करणे हा मूळ उद्देश आहे. या योजनेत कर्जत तालुक्यातील गावांचा समावेश झाल्यामुळे आता तालुक्यातील वन व्यवस्थापनाचा दर्जा तर उंचावेल शिवाय पर्यायी रोजगार देखील उपलब्ध होण्यास मदत होईल. 

1filmy4wap: कोणतेही bollywood movies , मराठी पिक्चर डाउनलोड करा मोफत ,हि आहे वेबसाईट

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे आता मतदारसंघातील गावात पर्यटन विकास, जंगल संरक्षण तसेच संवर्धन यासह पुनर्विकरण ऊर्जास्रोतांचा वापर यांचा विकास व स्वच्छतेसाठी उपाययोजनांचे काम मोठ्या प्रमाणात गाव व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने