Karjat:विखे कुटुंबाची कोरोनातून लवकर सुटका व्हावी व चांगले आरोग्य लाभावे यासाठी भाजपाची महाआरती

 अहमदनगर जिल्हा दक्षिणचे खा.डॉ. सुजयदादा विखे, माजी मंत्री राज्याचे नेते राधाकृष्ण विखे  पा.तसेच जिल्हा परिषद चे मा अध्यक्षा शालिनी विखे  यांच्यावर जे कोरोनाचे संकट ओढवले आहे.

या संकटातून संपूर्ण विखे कुटुबाची

 लवकरच सुटका व्हावी व विखे कुटूंबाला चांगले आरोग्य लाभावे व लवकरच जनतेच्या सेवेसाठी बळ मिळावे यासाठी कर्जत येथील गोदड महाराज मंदिरात भाजपाच्या वतीने महाआरती करण्यात आली. हि महाआरती कर्जत येथील प्रसिद्ध उद्योजक अरविंद काळोखे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विखे कुटुंबीयांसह महाराष्ट्र देश आणि सबंध जगावरचे कोरोनाचे  संकट टळू दे..! असे साकडे भाजपाच्या  पदाधिकार्‍यांच्यावतीने श्री. संत सदगुरु गोदड महाराज यांना घालण्यात आले. यावेळी 

 भारतीय जनता पार्टीचे  जेष्ठ नेते जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, युवक नेते दादासाहेब सोनमाळी सरपंच काकासाहेब धांडे,दिग्विजय देशमुख,गणेश क्षीरसागर, युवक नेते अनिल गदादे,रावसाहेब खराडे,रिपाइंचे तालुका अध्यक्ष संजय भैलुमे,   प्रदेश उपाध्यक्ष  विनोद दळवी, डॉ.संदीप बरबडे आदि. उपस्थित होते.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने