Mahatma Gandhi:तुम्ही आमच्यावर राज्य केले, आता देश सोडून जावा, असे ठणकावून सांगण्याची क्षमता सत्यामध्ये असून ते बापूजींनी निर्भीडपणे ब्रिटिशांना सांगितले. सत्याचा कधीच पराजय होत नाही, त्याचप्रमाणे अहिंसेचाही पराजय होत नाही. जगातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शस्त्राने दिले जाऊच शकत नाही. शस्त्राने दिलेल्या उत्तरांमध्ये कदाचित राज्य बदलेल, राजे बदलतील. पण, मूलभूत प्रश्न कधीच मिटणार नाही. ते मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी अहिंसकता हाच एकमेव मार्ग आहे. 

 

समाजव्यवस्था कशी असावी, माणसं कशी, त्यांचे व्यवहार कसे होते, त्यांच्यात कोणती मूल्ये रुजली, त्याचा अाविष्कार समाजजीवनावर होतो, यावर गांधीजी सतत विचार करीत होते. या प्रक्रियेला अनुकूल साधन म्हणजे सत्याग्रह, सविनय कायदेभंग, असहकाराद्वारे त्यांनी केलेले प्रबोधन आहे.


Post a Comment