संत गाडगे महाराज , मराठी निबंध

Marathi Nibandh: महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. त्या परंपरेतील एक थोर संत म्हणजे संत गाडगे महाराज त्यांचा जन्म १८७६ साली झाला. त्यांचे बालपणीचे नाव होते डेबू. त्यांचे वडील परिठाचा व्यवसाय करत ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मामाने त्यांचा सांभाळ केला. ते मामाच्या शेतात खूप कष्ट करत असत. व्यसने व अज्ञान यांमुळे समाजाची प्रचंड हानी होते, हे त्यांनी जवळून पाहिले. यामुळे त्यांनी व्यसनांचा धिक्कार केला आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचा निर्धार केला..

Marathi Nibandh:वाचनाची आवड मराठी निबंध

गाडगेबाबा स्वतःच्या संसारात गुंतले नाहीत. ते गावोगाव हिंडत व लोकजागृती करत. त्यांच्या हातात सदैव झाडू आणि गाडग्याचे फुटके खापर असे, म्हणूनच लोक त्यांना 'गाडगेबाबा' म्हणू लागले. ते जेथे जात, तेथे स्वतः झाडलोट करत व लोकांना कष्ट करण्यास प्रवृत्त करत. ते स्वत:साठी काही घेत नसत लोकांसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या, सदावर्ते चालवली. सदैव जनसेवेत ते रमले. ते लोकांना सांगत, “देव देवळात नाही, तो माणसांत आहे. आजही आपले शासन स्वच्छ गावांसाठी 'श्री संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान' या नावानेच स्वच्छतेची मोहीम राबवत आहे.

Post a Comment