Marathi Nibandh: वाचन हा एक चांगला छंद आहे. वाचनाने चांगली करमणूक होते. ज्याला वाचनाची आवड असते, त्याला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात पुस्तकाची चांगली सोबत होते. म्हातारपणीही वाचन हे खूप मदत करते. त्यामुळे म्हातारपणाचे दिवस कंटाळवाणे वाटत नाहीत.
वाचनाने ज्ञानप्राप्ती होते. वाचनाने खूप गोष्टींची माहिती होते. पूर्वीच्या काळात कोण कोण राजे होते, त्यांनी काय काय पराक्रम केले, हे इतिहासाची पुस्तके सांगतात. महापूर, दुष्काळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांत किंवा लढाया, आक्रमण अशा मानवांनी आणलेल्या संकटांत ती माणसे कशी वागली होती, ते आपल्याला ग्रंथवाचनातूनच कळते.
वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी माणसे आपली आत्मचरित्रे लिहून ठेवतात. काही माणसे इतर मोठ्या माणसांची चरित्रे लिहून ठेवतात. ही चरित्रे आपण वाचली, तर आपल्याला खूप शिकायला मिळते. काव्याची पुस्तके वाचल्यावर आपल्याला खूप आनंद मिळतो. सुंदर सुंदर कविता आपल्या ओळखीच्या होतात. पण या सगळ्यासाठी हवी वाचनाची आवड !
Post a Comment