Nagar Karmala Highway:दिनांक 16 जानेवारी 2022 कर्जत पोलीस स्टेशन (Karjat Police Station) हद्दीतील ज्योतीबाची वाडी ता. कर्जत येथुन नगर सोलापूर हायवे रोड (Nagar Solapur Highway Road) चे काम करणारे कॉन्ट्रॅक्टदार यांच्या कॅम्पमधून टाटा कंपनीची हायवा 10 टायर 38 लाख रुपये किंमतीची हायवा गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत कर्जत पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कायदा कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .सदर गाडीचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तपास पथके रवाना करण्यात आली परंतु गाडीचा तपास लागत नव्हता .सदर गाडीचा तपास चालू असताना कर्जत पोलिसांना सदर गाडीबाबत सुगावा लागला, सदरची गाडी पुणे जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी आली असल्याबाबत माहिती मिळाली त्यावरून सदर गाडीचा शोध सुरू करण्यात आला परंतु सदर गाडी मिळाली नाही. कर्जत पोलिसांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात तपास करून आरोपींची नावे निष्पन्न केली आणि त्यांचा माग काढणे सुरू केले. कर्जत पोलिसांनी आरोपीचा पाटस, तालुका दौंड पासून आरोपींचा पाठलाग सुरू केला, श्रीगोंदा-कोंभळी-मिरजगाव असा पाठलाग केला परंतु आरोपी मिळू शकले नाहीत.
कर्जत पोलिसांचा तपास चालू असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुणे ग्रामीण संपूर्ण जिह्याला ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल करून टाटा हायवा, 10 टायर पांढरे रंगाची गाडी कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत मधून चोरीला गेल्याची माहिती लोकांना देऊन मिळून आल्यास तात्काळ जवळचे पोलिसांना किंवा कर्जत पोलिसांना करून या बाबत आवाहन केले होते त्यामुळे स्थानिक लोकांना गाडीबाबत माहिती मिळाली. सदर गाडी कुसेगाव ता.दौंड जि.पुणे येथे कुसेगाव ते सुपा रोडला बाजूला माळावर उभी असल्याची माहिती पोलिस पाटील कुसेगाव यांना मिळाली, त्यांनी तात्काळ सदर गाडीची माहीती पाटस येथील पोलिस चौकी ला पोलीस हवालदार सुरेश देवकाते यांना कळविली. पाटस पोलिसांनी तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना कळविली. त्यावरून कर्जत पोलिसांनी सदर चोरीस गेलेली टाटा कंपनीची हायवा 10 टायर गाडी 38 लाख रुपये किंमतीची गाडी कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतल्याने गाडी मिळवण्यात यश आले.
Post a Comment