National Start-up Day: 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस ,16 जानेवारी जाणून घ्या महत्व !

National Start-up Day: 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस ,16 जानेवारी जाणून घ्या महत्व !


National Start-up Day: भारत 16 जानेवारी हा "राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस" म्हणून साजरा करणार आहे, असे पंतप्रधानांनी शनिवारी सांगितले.


"स्टार्ट-अपची संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी, 16 जानेवारी हा "राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी देशभरातील स्टार्ट-अपना संबोधित करताना सांगितले.पंतप्रधान म्हणाले की 2022 ने भारताच्या स्टार्ट-अप क्षेत्रासाठी अधिक नवीन संधी आणल्या आहेत आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात स्टार्ट-अप इंडिया इनोव्हेशन वीकचे आयोजन देखील महत्त्वाचे आहे.

Internet Speed Test: इंटरनेट स्पीड टेस्ट , कसे करायचे जाणून घ्या !


कृषीआरोग्यउद्योजकअवकाशउद्योग 4.0सुरक्षातंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवापर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी होतील. 150 हून अधिक स्टार्टअप्सची ग्रोइंग फ्रॉम रूट्सडीएनए विषयक माहितीस्थानिक ते जागतिकभविष्यातील तंत्रज्ञानउत्पादन क्षेत्रात जगज्जेते घडवणे आणि शाश्वत विकास या संकल्पनांवर आधारित सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली आहे. प्रत्येक गट त्यांना दिलेल्या संकल्पनेवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करेल. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून10 ते 16 जानेवारी 2022 दरम्यानवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे "सेलिब्रेटिंग इनोव्हेशन इकोसिस्टम" हा आठवडाभर चालणारा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 6 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला आहे.


स्टार्टअप्सच्या देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या क्षमतेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या शुभारंभात हे प्रतीत झाले. सरकारने स्टार्टअपच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यावर काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप परिसंस्थेवर उत्तम परिणाम झाला आणि त्यामुळे देशात युनिकॉर्नची आश्चर्यकारक वाढ झाली आहे.


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने